आई गेली पाखरु हरवल…
मनगटातल बल नाहीस झाल…
लखलखत्या उन्हात सावली तू…
हाक आई आता कुणा मारू मी…
सांग ह्या जमान्यात जगू कसा ….
आई होती म्हणून पदरात भय नव्हते…
वाट तुझी पाहता टाहो फोडला मी…
निज बाळा राज्या अंगाई कोण गाईल आता…
कोणता काळ आला तू गेलीस दूर…
स्वप्न आयुष्यात कोणा सांगू आता…
कधी कोणाची आई न मरो…
जीव पाखरांचा असा नको तडपो…