जेव्हा मी मृत्यूची सुद्धा तारीख ठरविलं मनासारखी…
मृत्यू येईल भेटायला …
कोणी दगा दिला तर लगेच…
कोणी दुखवलं मन तर तडफडत बस…
कोणी नाहीसा झाला तर हताश होऊन रहा …
येवड रड आतड्याच्या बेंबी पासून
जिथं फक्तं मृत्यूच उरेल…
ह्या आयुष्याला मरण सुद्धा तुझ्या इच्छेनुसार येईल…
त्या आदोगर मन मोकळं कर …
लहान होऊन आईच्या स्तनापाशी निज…
रडतांना आकांत कर…
मातीही चाखून घे जराशी…
नवलाईने एकटक बघ…
माथ्यावर आट्या आणू नकोस…
ईवलस असताना तेव्हा नसत कोणी मन दुखवणार….
नसतो प्रश्न भ्रम-निराशेचा , प्रेमभंगाचा
काहीच नसते मनात निरंतर प्रकाश आणि निर्मळ मनाचे डोळे
पाहत राहतात समुद्राच्या नितळ प्रवाहासारखे…
तरी क्षितिज्या…
छाती भरली माझी दुःखाच्या डोंगराने हे मरणा मला लगेच घेऊन जा…
जेव्हा मी मृत्यूची सुद्धा तारीख ठरविलं मनासारखी…