मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे…
ईथे युद्ध नव्हे तर बुद्ध पेरला पाहिजे…
करुणेची बाग फुलली पाहिजे…
स्वातंत्र्याचा थवा उडवून…
हृदयात क्रांतिची ज्योत पेटली पाहिजे…
ईथे तलवार नव्हे तर शाई जिंकली पाहिजे…
विचाराचा मळा बहरला पाहिजे…
अथांग ज्ञानाचे प्रतिक होऊन…
मस्तकात आंबेडकर भिनला पाहिजे…