baapmanus Baap ek aadhar..!

मिठनारे डोळे ऐका जराशी…

हाक कानावर बाबा ऐका जराशी…

डोळे बंद निपचिप जोप लागली ना…

पायापाशी बसून आहे डोळे माझे पूसा ना…

डोळे भरून आले आई ने टाहो फोडला होता…

दुःख तुझ्या नसण्याचे जिवंतपणी भास झाले…

मी करकरीत उन्हात उभा सावली साठी…

बाप म्हणून हाक मारली माघे शांतता जाहली…

टाहो फोडून अंतरीचा घाव मिटवू कसा …

बाप नसण्याचे दुःख कवितेत मांडू कसा…

भर उन्हात राहून जात मनातलं बोलणं…

पावसाळ्यात आठवणींचा वसंत जमा होतो …

नसतील जेव्हा बाबा तू सर्व अंधारात चाचपडत राहील…

तुझीच आठवण मनात कायमची राहील…

सोडून जाऊ नकोस म्हणताना मनगट घट्ट पकडलेला होतास…

जाणीव नव्हती कपाळावरुन हात फिरवलेला थंड पडला होता …

Leave a Comment