तर मित्रांनो आपण पाहतो की आपल्या सर्वसामान्यांसाठी व घरात लाईटी चा हा ताळमेळ नसतो. म्हणजेच शहरी भागात विद्युत ऊर्जा म्हणजेच लाईट हे चोवीस तास असते. पण आपल्या खेड्यापाड्यात म्हणजेच गावाकडे लाईट चोवीस तास नसून फक्त आठ तास असते. त्यामुळे आपल्याला प्रचंड हाल सोसावे लागतात. व आपल्या पिकांना देखील त्याचा फटका जाणू लागतो. व बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. व तसेच आपल्या घरात उपकरणे जास्त असल्याकारणाने लाईट बिल देखील जास्त भरावे लागते. यासाठी या लाईट बिल मधून कायमची सुटका मिळवण्यासाठी आज ही योजना आपण पाहणार आहोत.
Pradhan Mantri Solar Panel Yojana योजनेचा मुख्य उद्देश काय आहे :
Pradhan Mantri Solar Panel Yojana : तर मित्रांनो केंद्र सरकारने या योजनेद्वारे सर्वसामान्यांना दिलासा मिळण्यासाठी हि योजना राबवली गेलेली आहे. व तसेच प्रत्येकाच्या घरात चोवीस तास लाईट मिळावी हा मुख्य उद्देश आहे. आणि तसेच आपल्या पैशाची बचत देखील होणार आहे. सोलर पॅनल बसवल्यानंतर आपल्याला कमीत कमी दहा ते पंधरा वर्षांसाठी कोणत्याही लाईट बिल भरायची गरज भासणार नाही. म्हणजेच आपल्याला लाईट बिल पासून व लाईटच्या इतर खर्चापासून कायमची मुक्ती म्हणजेच सुटका मिळेल.आणि अशाच प्रकारे आपण आपल्या घर खर्चापासून आपला खर्च वाचवता येईल.
मित्रांनो ही योजना कायमस्वरूपी नसून फक्त काही मर्यादित काळापूर्ती आहे म्हणजेच. मित्रांनो बांधवांनो केंद्र सरकारने या योजनेची मुदत 2026 पर्यंत वाढवण्याचे ठरवले आहे. म्हणजे आत्ता देखील ही योजना सुरू आहे, आणि आता देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना 2026 पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे .
कारण ,जेणेकरून देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला व प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता यावा. आणि डिजिटल भारत या उद्देशानेच हा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. व मित्रांनो हा सोलर पॅनल आपण कुठेही व कोणत्याही जागेवरती लावू शकतो. आपल्या वावरात देखील किंवा आपल्या घराच्या छतावर देखील आणि विजेच्या वापर होणाऱ्या वस्तू पासून आपल्या गरजा भागवू शकतो.
मित्रांनो ही योजना केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला व नागरिकाला 40% ते 90 टक्के पर्यंत अनुदान दिले जाणार आहे :
Pradhan Mantri Solar Panel Yojana तर मित्रांनो आता आपण या योजनेसाठी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा ऑनलाईन करायचा की ऑफलाइन करायचा यासाठी लागणारी कागदपत्रे काय काय असतील व यासाठी कोणत्या गोष्टी साध्य करावी लागतील याची अधिक सविस्तर अशी माहिती आम्ही खालील प्रमाणे पाहणार आहोत.
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा व कुठे करायचा :
तर मित्रांनो सर्वात अगोदर आम्ही तुम्हाला खाली एक लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल, क्लिक केल्यानंतर सौर पॅनल एप्लीकेशन फॉर्म या नावाने ऑप्शन येईल त्या ऑप्शन वरती क्लिक करून उघडायचे आहे.
नंतर तुम्हाला तिथे एक नवीन पेज ओपन होईल जिथे तुम्हाला तुमचे स्वतःचे राज्य निवडायचे आहे. आणि नंतर पुढे एक फॉर्म भरण्यासाठी पेज ओपन होईल. जिथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. मित्रांनो माहिती चुकीची भरल्यास तुम्हाला त्या या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे ही माहिती भरल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तपासून पहा,आणि सबमिट करून टाका.
तर मित्रांनो ही माहिती पूर्ण भरल्यानंतर लगेच दहा किंवा पंधरा ते वीस दिवसांनी तुम्हाला तुमच्या घरी एक एजंट येईल जो की तुमच्या घराची सविस्तर पाहणी करेल आणि पाहणी केल्यानंतर तुमच्या घरात किंवा वावरात, जिथे तुम्हाला सोलर पॅनल बसवायचे आहे. तिथे तुम्हाला सोलार पॅनल बसवून देईल. आणि हो मित्रांनो हे सोलर पॅनल बसवल्या नंतर एक ते दीड महिन्यात तुम्हाला सरकारकडून तुमची रक्कम खात्यात जमा केले जाईल.