नेहमीची वेळ झाली.मी तिची वाट पाहत होतो. मखमली हृदयातून रिमझिम पाऊस पडत होता. मन उधाण वाऱ्यासारख झालेल.
चाफ्यावर पावसाचा एक एक थेंब अंगाला शहारा फुलवत होता. पक्षी गीत गात होते जणू. झाडाची पालवी हवेच्या वेगाने मंद मंद डोलत होती. पानझड झालेल्या झाडाची पाने हवेत मिसळत आणि हळूच धूळ डोळ्यावर मारा करत होती. सगळ काही हवेच्या वेगाने सुरू होत. जणू काही मन फांदीवर हिंदोळ्या घेत आहे. सर्व काही सुरळीत सुरू होत. आणि त्याच वेळेस हवा वेगाने वाहू लागली. मंद ऊन नाहीशी होऊन पावसाचे थेंब जोरजोराने माथ्यावर पडत होते. तेवढयात ती पळत येत होती. ओडणीने पावसाच्या पाण्याने स्वतःचे रक्षण करत होती. मला तर तिची केविलवाणी धडपड वाटली. पहिल्या पावसात कोणाला भिजू वाटत नाही. सर्व सजीव पहिल्या पावसात हजेरी लावतात.
मी थांबून असलेल्या टपरी पाशी ती आडोशा घेऊन उभी होती. सर्व काही मनात चालत होत. आज रिमझिम पावसाने मन प्रसन्न केलं मात्र जोरदार पावसाच्या सरिने तिची आणि माझी भेट करून दिली. पाऊस येत होता तस तिचं मन मला कळत होत. तिला माहित होत की मी तिची रोज वाट पाहत असतो. पण नियतीच्या मनात आजचा वार होता जणु .माझ्या मनातली रोजची धडपड तिला जणु आज एकाच दिवसी कळली. पाऊस येत होता तसा चहाचा सुगंध दळवळत होता. मी चहा माघवला आणि पित एकतर्फी बसलो. तेवढयात काही तरी बोलावं आणि आमच्या नात्याला सुरुवात करावी अस काही घडत नव्हत. तिन माझ्याकडे एकटक पाहणं कदाचित माझ्या न बोलण्याच कारण असेल. पाऊस सारखा पडत होता. खूप दिवसांची मनातली घालमेल पावसाच्या पाण्याने निरभ्र व्हावी तस माझ्या तोंडून चहा पीतेस का. हे नाविन्य पूर्वक वाक्य तोंडून निघालं. तस आजूबाजूची लोक पाहत तर कोणी नुसती बसून. त्यात माझी हिंमत हे बाहेरून वाघ मात्र आतून भेदरलेल्या सश्या सारखी झाली होती.
तेवढयात काही न बोलता तिने मान हलवली आणि एक वाफाळलेला चहा तिच्यासाठी माघवला. ती चहा पित होती मात्र मन तिच माझ्याकडे होत. सर्व काही मलाही कळू लागेल त्या आधी ती अचानक पाऊस आणि सर्व पूर्वी सारख व्हावं तशी ती निघून गेली. वाटलं पाऊस उगाच थांबला. रिमझिम निदानत पाऊसाचे थेंब केसांवर पडत होते. तिला की नजर संपेपर्यंत पाहत होतो. ती नजरे पल्याड गेली हे सुद्धा आनंदाच्या भरात कळतं नव्हत. पण मनात आठवन राहिली उनातल्या पावसाची जी आयुष्भर न विसरल्यासारखी होती. मनातला पाऊस रिमझिम पडत होता अलगत सार काही मन बैचेन होऊन उद्याचा दिवस कधी उजाडेल ? आणि तिची भेट होईल या आशेने आजचा पाऊस मनात स्मरणीय झाला होता.