iocl apprentice bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण इंडियन ऑइल अंतर्गत होणाऱ्या अप्रेंटिस पदासाठी तब्बल 1770 जागांसाठी होणाऱ्या पदभरतीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही पदवीधर असाल किंवा आयटीआय केलेला असेल तसेच बारावी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तब्बल 1770 जागांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे
चला तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत जसे की भरतीचा विभाग भरतीची प्रक्रिया व भरतीची श्रेणी त्याचबरोबर भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा व लागणारी शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रता तसेच भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारांसाठी किती वेतनश्रेणी असणार आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
तर मित्रांनो इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतामध्ये एक सरकारी कंपनी असून देशातील सात महारत्न कंपन्यांपैकी एक कंपनी आहे ज्यामध्ये इंडियन ऑइल महसुलानुसार देशातील सर्वात मोठी तर जगातील 88 कंपनी आहे त्याचबरोबर भारतामध्ये पुरवले जाणारे खनिज तेल उत्पादन हे या कंपनीचे 49% आहे तिची मालकी सध्या भारत सरकारकडे आहे.
भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार कसा असणार आहे ?
तर मित्रांनो या भरतीचा विभाग हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत असून अप्रेंटिस पदासाठी तब्बल १७७० जागांसाठी ही पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती विभागाने नमूद करण्यात आलेली आहे तसेच या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी कायमस्वरूपी ची नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय या कॉर्पोरेशन अंतर्गत घेतला जाणार आहे.
त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व इतर अहर्ता काय असणार आहे ?
मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता ही बारावी पासून ते पदवीधर असण्यापर्यंतच्या उमेदवारांसाठी आहे बारावीचा उत्तीर्ण झालेला उमेदवार व पदवीधर असलेला उमेदवार त्याचबरोबर आयटीआय डिप्लोमा केलेला असलेला उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतो व या संधीचा लाभ घेऊ शकतो.
यासाठी लागणारी वयोमर्यादेची अट ही 31 मे 2025 पर्यंत उमेदवार हा 18 ते 24 वर्षा दरम्यानचा असावा त्याचबरोबर प्रवर्गानुसार यामध्ये सूट देण्यात आलेली आहे जसे की एससी एसटी या प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट तर ओबीसी या प्रवर्गासाठी तीन वर्षाची सूट तर पीडब्ल्यूडी या प्रवर्गासाठी दहा वर्षाची सूट असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क मागविण्यात येणार नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारची अर्ज शुल्क मागविण्यात आल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी.
निवड प्रक्रिया व वेतनश्रेणी किती असणार आहे ?
तर मित्रांनो निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे असणार आहे व वेतनश्रेणी हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या नियमानुसार असून खालील दिलेल्या पीडीएफ मध्ये नमूद करण्यात आलेला आहे.
पदांची नावे व एकूण पदसंख्या किती असणार आहे ?
तर मित्रांनो यामध्ये विविध पदांसाठी 1770 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यामध्ये ट्रेंड्स अटेंडंट ऑपरेटर त्याचबरोबर मेकॅनिकल तसेच ट्रेड अप्रेंटिस सेक्रेटरी असिस्टंट अकाउंटंट व डाटा एन्ट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी ही पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख किती असणार आहे ?
तर मित्रांनो या पदभरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दोन जून 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे संबंधित उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून या पदभरतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्रांना व जवळच्या नातेवाईकांना तसेच हितचिंतकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ मिळेल व ते देखील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचू शकतील
महत्त्वाची सूचना सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केल्यानंतर कुठल्याही प्रकारची कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने सादर करू नयेत किंवा मुदतबाह्य असलेले कागदपत्रे सादर करू नयेत असे आढळून आल्यास इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत त्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल व तो उमेदवार परीक्षेसाठी बसू शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच कुठल्याही प्रकारचे गैर वर्तणूक आढळल्यास अशा देखील उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात येईल व त्याला परीक्षेमध्ये बसता येणार नाही व तो उमेदवार पात्र ठरणार नाही