District Legal Service Authority Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विभागा अंतर्गत होणाऱ्या भरती बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम या भरतीबद्दल पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या कार्यालयात असलेल्या पदांसाठी पदभरती करायची असून त्यासाठी योग्य उमेदवाराकडून तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तरी देखील आपण पात्र किंवा इच्छुक उमेदवार असाल तर लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा व अशा पद्धतीचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो ही एक मोठी सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची संधी आपल्यापुढे निर्माण झालेली असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अर्थात महाराष्ट्र शासनाच्या या विभागा अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी शासना मार्फत नवीन पीडीएफ जी आर प्रकाशित करण्यात आलेला असून प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अर्थात जिल्हा विधी सेवा द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी देखील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून अशा पद भरतिचा लाभ घ्यावा.
तर मित्रांनो या भरती बद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी जाणून येणार आहोत जसे की हा भरतीचा विभाग कोणत्या विभागामार्फत येतो किंवा पदाचे नाव काय असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता किती असणार आहे व मासिक मानधन किती असणार आहे व त्याचबरोबर परीक्षा शुल्क किती असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत कोणती असणार आहे व अशी इतर आवश्यक पात्रता व भरतीचा कालावधी कसा असणार आहे अशी इतर माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
भरतीचा प्रकार -तर मित्रांनो या भरतीचा प्रकार अर्थात विभागा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर द्वारे प्रकाशित करण्यात आलेली असून विभाग देखील याच मार्फत येत आहे तसेच हा भरतीचा प्रकार हा सरकारी विभागात महाराष्ट्र शासनाच्या विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झालेली आहे
शैक्षणिक पात्रता व मासिक मानधन अर्थात वेतन किती असणार?
तर मित्रांनो यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ह पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे तसेच मासिक मानधन किमान 25 हजार रुपये दर महिना निवड झालेल्या उमेदवारांना मानधन म्हणून दिले जाणार आहे तसेच या पदांची नावे पाहण्यासाठी खालील दिलेली लिंक ओपन करावी व ती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या या विभागामार्फत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले असून शासनाने यामध्ये भरतीचा कालावधी देखील नमूद करण्यात आलेला आहे याचा भरतीचा कालावधी कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार असून पुढील कालावधीमध्ये परमनंट तत्वावरती घेण्यात येईल असे देखील या जीआर मध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे तसेच यामध्ये पदाचे नावे लेखापाल म्हणून देखील सादर केलेली आहे. यामध्ये एकूण रिक्त पदे भरण्यात येणार असून नोकरीचे ठिकाण हे महाराष्ट्रामधील गोंदिया जिल्ह्यातील असणार आहे.
इतर शैक्षणिक आवश्यक असणारी पात्रता
तर मित्रांनो जर तुम्ही पातळ व इच्छुक उमेदवार असाल तर तुमच्याकडे किमान ही पात्रता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त वाणिज्य पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण तुमचे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेतून टंकलेखन अर्थात टायपिंग झालेली असावी मराठी 30 व इंग्रजी 40 अशी टंकलेखन किंवा टायपिंग झालेली असावी. त्याबरोबर एमएस-सीआयटी देखील केलेली असावी
उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व उच्च न्यायालय विधी सेवा समिती तसेच उप समित्या जिल्हा विधी प्राधिकरण किंवा कोणतेही न्यायालय किंवा न्यायाधीकारणात अधिकारी म्हणून काम केलेले असल्यास किमान दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आणि त्याचे प्रमाणपत्र असणे अशा उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल त्याचबरोबर उमेदवारांनी कोणत्याही संस्थेत लेखापाल म्हणून तीन वर्षाचा जर अनुभव असेल तर त्यांना देखील प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अकाउंटिंग सॉफ्टवेअर अँड कॉम्प्युटर प्रोग्राम्स मायक्रोसॉफ्ट ऑफिस टॅलीचे ज्ञान देखील पात्र व इच्छुक उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात 11 महिने कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात काम करण्याची संधी मिळणार असून उमेदवारांचा या पदावरती कायम करण्याच्या कोणताही हक्क राहणार नाही कायम करण्याचा निर्णय हा शासनाच्या मार्फत घेतला जाईल तसेच या सोबतच अर्जाचा नमुना दिलेला असून त्या पद्धतीचा अर्ज पात्र व इच्छुक उमेदवारांनी भरून अंतिम तारीख पर्यंत दुपारी पाच वाजेपर्यंत नोंदणीकृत डाक विभागाकडून किंवा हस्त देह द्वारे खालील पत्त्यावरती पोहोचवावा त्यानंतरच उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार आहे अंतिम तारीख त्यानंतर कुठल्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही याची देखील नोंद या ठिकाणी पात्र उमेदवारांना घ्यायची आहे
सादर केलेल्या अर्जावरती उमेदवारांकडून पोस्टाच्या लिफाफ्यावर कोणतेही पदांकरिता अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करावे तसे नसल्यास तरी देखील अर्ज अपूर्ण समजून त्याचा विचार केला जाणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज करावा अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेबाबतच्या प्रति जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर निवड केलेल्या उमेदवारांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे करारनामा लिहून घ्यावा लागेल तर मित्रांनो पात्र व निवड झालेल्या उमेदवारांची निवड ही गोंदिया जिल्ह्यांसाठी असणार आहे महाराष्ट्र मधील इतर जिल्ह्याच्या ठिकाणी नसून फक्त गोंदिया जिल्ह्यामध्येच याची निवड करून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भरती प्रक्रियेची पुढील माहिती व अधिकृत माहिती जसे की अर्ज करण्याची अंतिम तारीख व अर्ज पाठवण्याचा पत्ता खालील प्रमाणे नमूद केलेली आहे.
तर मित्रांनो अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करून यापद्धतीचा लाभ घ्यावा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश विधी सेवा ग्रह जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हा गोंदिया महाराष्ट्र पिनकोड क्रमांक 44 1601
तर मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वेळेच्या अगोदर म्हणजेच अंतिम तारीख येण्याच्या अगोदर सादर करावेत व अशा सरकारी विभागांमध्ये होणाऱ्या पदभरती चा लाभ घ्यावा.
महत्त्वाची सूचना : तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल तसेच आपल्या जवळच्या हितचिंतकांना व जवळच्या मित्रांना तसेच गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की माहिती पोहोचवा जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत गेल्यास त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल धन्यवाद..!