माझ्या अनुभवातील शरद पवार साहेब…
माझा एक चांगलाच मित्र जमला…
थेट ऐंशीच्या जवळीचा आणि मी एक पंचविशीतला तरुण…
वाटत असेल तुम्हाला आमची मैत्री कशी काय जमली…
तर झालं असं…
आमच्या मैत्रीचे नाते आहे वैचारिक वळणाचे…
साहेब तुम्ही जेव्हा नामदेव ढसाळ वाचून दाखवला…
आणि
मी तेवढ्याच काळात विद्रोहाची पाने चाळत होतो…
तुम्ही भर पावसात झंझावाती वादळासारखे बरसला…
आणि
मी तसाच पावसात भिजत-भिजत कुठेतरी चहा पित-पित लिहीत होतो…
तुम्ही साहेब कर्तृत्वाच्या पटलावर उद्योगशिल आहात…
आणि
मी उद्योगाच्या खटपटीत नेहमीच गुंतलेलो…
साहेब
तुमचं आणि आमचं सर्व काही सेम वाटत मला…
फार फार तर काय फरक…
आमच्या पेक्षा आजही तुम्ही खूप-खूप तरुण वाटतात मला…