salokha yojana | शेतजमिनीच्या ताब्यासंदर्भातील वाद मिटवणारी सलोखा योजना..!

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

salokha yojana  राज्य सरकारकडून शेतजमिनीच्या ताब्यावरुन शेतकऱ्यांमध्ये असणारे आपआपसातील वाद परस्पर सामंजस्याने मिटवण्यासाठी ‘सलोखा योजना’ सुरु करण्यात आली आहे. शेतजमीनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांचे • आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील सौख्य व सौहार्द वाढीस लागण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. salokha yojana in marathi

salokha yojana  काय आहे योजना ?

salokha yojana  सलोखा योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असेल, तर अशा शेतजमीन धारकांचे दस्तांच्या अदलाबदलीसाठी नोंदणी फी व मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येत आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पिक विमा जमा..!

crop insurance maharashtra

शेतजमीन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क नाममात्र एक हजार रुपये आणि नोंदणी शुल्क नाममात्र एक हजार रुपये आकारण्याबाबत सवलत देण्यासाठी ही “सलोखा योजना” राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये पहिल्याचा ताबा दुस-याकडे व दुस-याचा ताबा पहिल्याकडे असणा-या जमीनीच्या दोन्ही बाजुकडील क्षेत्रामध्ये कितीही फरक असला तरी ते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील. अकृषिक, रहिवासी तसेच वाणिज्यिक वापराच्या जमिनीस सदर योजना लागू राहणार नाही.

मुलीच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून मिळणार आर्थिक मदत..!

Lek ladaki yojana

salokha yojana  पहिल्या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा दुस-या शेतक-याकडे व दुस-या शेतक-याच्या शेतजमीनीचा ताबा पहिल्या शेतक-याकडे या व्यतिरिक्त इतर वैयक्तीक जमीनीचे अदलाबदल करण्याबाबतच्या प्रकरणांचा सलोखा योजनेत समावेश असणार नाही किंवा अशी प्रकरणे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी सवलतीस पात्र असणार नाही.

लाईटीचे टेन्शन संपले बाजारामध्ये आले छोटे इन्वर्टर कुठेही घेऊन फिरता येणार इथे पहा किंमत..!

Portable Inverter

सलोखा योजना अंमलात येण्यापूर्वी काही पक्षकारांनी जमिनीची अदलाबदल केली असेल किंवा अदलाबदल करण्यासाठी दस्तासाठी अगोदरच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी भरली असेल तर त्याचा परतावा मिळणार नाही.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!