PM Kisan Mandhan Yojana | पंतप्रधान किसान मानधन योजना कोण ठरणार पात्र,काय आहे योजना वाचा सविस्तर बातमी..!

PM Kisan Mandhan Yojana | पंतप्रधान किसान मानधन योजना कोण ठरणार पात्र,काय आहे योजना वाचा सविस्तर बातमी..!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Mandhan Yojana प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही मासिक निवृत्तीवेतन योजना आहे. योजनेच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा सरकारचा मानस आहे. योजनेअंतर्गत पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी पेन्शन देण्यात येणार आहे.

PM Kisan Mandhan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता ?

PM Kisan Mandhan Yojana योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर महिना किमान 3000 रुपये पेन्शन दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी आपली नोंदणी करू शकतात.

• छोटे आणि मध्यम शेतकरी
• संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशाच्या भूमी अभिलेखानुसार 2 हेक्टरपर्यंत शेत जमीन नावावर असलेले 18 ते 40 वयोगटातील शेतकरी.

PM Kisan Mandhan Yojana योजना काय आहे?

PM Kisan Mandhan Yojana या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना त्यांच्या वयाच्या 60 वर्षांपर्यंत दरमहा 55 ते 200 रुपयांपर्यंत योगदान द्यावे लागते. योगदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून जी रक्कम भरली जाईल, तेवढीच रक्कम सरकार देखील जमा करेल.

PM Kisan Mandhan Yojana योजनेतील सहभागी शेतकरी 60 वर्षांपूर्वी मरण पावला तर शेतकऱ्याची पत्नी किंवा महिला शेतकऱ्याच्या संदर्भात महिलेचा पती उर्वरित वयापर्यंत योगदानाची रक्कम भरून योजनेत कायम राहू शकतात. जर त्यांना योजना पुढे सुरु ठेवायची नसेल तर मृतक शेतकऱ्याने मृत्यू तारखेपर्यंत जमा केलेली रक्कम शेतकऱ्याच्या जोडीदारास किंवा नामनिर्देशित व्यक्तीस सव्याज परत केली जाईल.

PM Kisan Mandhan Yojana लाभार्थी शेतकऱ्याचा वयाच्या 60 वर्षानंतर मृत्यू झाल्यास शेतकऱ्याच्या जोडीदारास पेन्शन म्हणून 1,500 किंवा 50% पेन्शन दिली जाईल. शेतकरी आणि जोडीदाराच्या मृत्यूच्या परिस्थितीत संचित निधी पेन्शन फंडामध्ये जमा केला जाईल.

PM Kisan Mandhan Yojana अर्ज कसा करावा?

PM Kisan Mandhan Yojana छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या सामान्य सेवा केंद्रात जाऊन या योजनेसाठी नोंदणी करता येईल. योजनेत सहभागी होण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर जाऊन क्लिक करा.

PM Kisan Mandhan Yojana लिंक 

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!