Mudra Aryog Card | देशभरातील 23.58 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डचे वितरण

ReyMudra Aryog Card आतापर्यंत देशातील 23.58 कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Mudra Aryog Card केंद्र सरकारकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माती परीक्षण प्रयोगशाळांसाठी एकूण 229.95 कोटी रुपये जारी केले गेले आहेत. त्यापैकी 83.31 कोटी रुपये गेल्या पाच वर्षात जारी करण्यात आले असल्याचे देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले.

Mudra Aryog Card केंद्र सरकारकडून 2015 मध्ये ‘राष्ट्रीय मृदा आरोग्य कार्ड’ योजना सुरू करण्यात आली होती. मृदा आरोग्य कार्ड शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीतील पोषक घटकांची माहिती देते. तसेच या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीचे आरोग्य आणि त्याची उत्पादकता सुधारण्यासाठी लागू करावयाच्या पोषक तत्वांच्या योग्य डोसची शिफारस देखील केली जाते.

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!