krushi puraskar 2024 राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन, आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाते. यंदाच्या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी येथे करण्यात आले असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
krushi puraskar 2024 यंदाच्या कृषी पुरस्कार समारंभात कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षातील एकूण 448 पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादाजी भुसे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Krushi Bhushan puraskar या सोहळ्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार (1), वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार (8), जिजामाता कृषीभूषण पुरस्कार (8), सेंद्रिय शेतीतील कृषीभूषण पुरस्कार (8), वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार (8), उद्यान पंडित पुरस्कार (8), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (40), पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार (10), युवा शेतकरी पुरस्कार (8), तसेच राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजनेंतर्गत अन्नधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य पिकांचे पुरस्कार वितरित केले जातील.
krushi puraskar कृषी विभागाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये कृषी पुरस्कारांच्या रकमेत चार पट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच पुरस्कार विजेत्यांच्या प्रवास भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
The Agriculture Department of the State Government honors the farmers, individuals, institutions, as well as officers and employees who have done outstanding work in agriculture, horticulture and allied fields by presenting Agriculture Awards.Agriculture Minister Dhananjay Munde has informed that this year’s Krishi Award distribution ceremony has been organized on September 29, 2024 at 5 pm at the National Sports Club of India (Dome), Worli in Mumbai.
In this year’s agriculture award ceremony, a total of 448 awards for the three years 2020, 2021 and 2022, which were pending due to Covid and various reasons, were distributed by Governor C.P. It will be conducted by Radhakrishnan The program will be held in the presence of state Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar, Agriculture Minister Dhananjay Munde, Employment Guarantee Minister Dadaji Bhuse and School Education Minister Deepak Kesarkar.
In this ceremony, Dr. Punjabrao Deshmukh Krishi Ratna Award (1), Vasantrao Naik Krishi Bhushan Award (8), Jijamata Krishi Bhushan Award (8), Krishi Bhushan Award in Organic Farming (8), Vasantrao Naik Krishi Bhushan Award (8), Udyan Pandit Award (8),Vasantrao Naik Farmer Award for Agriculture (40), Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Krishi Seva Ratna Award (10), Yuva Shetkari Award (8), as well as awards for food grains, pulses and pulses under the State Crop Competition Scheme will be distributed.
In February 2024, the agriculture department had decided to increase the amount of agricultural awards by four times. Also, the travel allowance of award winners has also been increased. The Ministry of Agriculture has appealed to farmers and citizens to attend this program in large numbers.