Kisan Vikas Patr Yojana नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो किसान विकास पत्र ही पोस्ट विभागाची अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करून शेतकरी 115 महिन्यांत त्यांचे पैसे दुप्पट करू शकतात.
Kisan Vikas Patr Yojana योजना काय आहे?
किसान विकास पत्र ही योजना भारत सरकारद्वारे चालवली जाणारी एकरकमी गुंतवणूक योजना आहे. योजना सर्वप्रथम 1988 मध्ये लघु बचत प्रमाणपत्र योजना म्हणून सुरू करण्यात आली होती. योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली, तेव्हा ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच होती. त्यामुळे योजनेला किसान विकास पत्र असे नाव देण्यात आले होते. आजघडीला मात्र योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकते.
गाय गोठा साठी मिळणार तब्बल दोन लाख रुपयाचे अनुदान, दोन दिवसात बँक खात्यात पैसे जमा होणार..!
पैसे दुप्पट कसे होणार?
किसान विकास पत्र योजनेअंतर्गत गुंतवणूकदार फक्त 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात. या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये गुंतवणूकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. म्हणजेच योजनेत गुंतवणूकदार आपल्याला हवे तेवढे पैसे गुंतवू शकतो.
केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी किसान विकास पत्रावरील व्याजदर वार्षिक 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के केला आहे. म्हणजेच, आता या योजनेत गुंतविण्यात आलेले पैसे 120 महिन्यांऐवजी केवळ 115 महिन्यांत दुप्पट होतील. कृपया लक्षात असू द्या की हा 7.5% व्याजदर 1 जुलै 2023 पासून लागू आहे आणि व्याज दरात वेळोवेळी बदल केले जाऊ शकतात.
योजनेसाठी पात्रता
- अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदारांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने प्रौढ अर्ज करू
शकतात.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- किसान विकास पत्राचा अर्ज
- वय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली कर्जमाफी असे तपासा यादीमध्ये नाव..!
अर्ज कसा करायचा?
योजनेअंतर्गत खाते उघडून गुंतवणूक सुरू करणे अतिशय सोपे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक खाते उघडू शकता. तुम्हाला फक्त आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरायचा आहे आणि गुंतवणुकीची रक्कम जमा करायची आहे.