E-nam yojana | ई-नाम योजना: कृषीमालाच्या ऑनलाइन विक्रीसाठीचा मंच

E-nam yojana कृषीमालाच्या विक्रीसाठी “एक राष्ट्र- एक बाजारपेठ” या संकल्पनेसह ‘राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ‘ योजना सुरू करण्यात आली. देशभरातील कृषी बाजारपेठांच्या एकत्रीकरणातून ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्म स्थापित करून कृषी मालाच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात एकच सामायिक मंच स्थापित करण्याच्या उद्देश्याने ही योजना सुरू करण्यात आली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

E-nam yojana राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) हा कृषी विपणनातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्याद्वारे शेतकरी डिजिटल पद्धतीने अनेक बाजारपेठांमध्ये आणि खरेदीदारांपर्यंत पोहोचू शकतात. शेतकऱ्यांसाठी कृषी मालाची विक्री सुलभ करण्याची गरज लक्षात घेऊन ही योजना सुरू करण्यात आली आहे. ई-नाम मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषिमालास चांगली किंमत मिळण्यास मदत होते आणि अधिकाधिक बाजारपेठांमध्ये पोहोच मिळते.

E-nam yojana काय योजना आहे?

E-nam yojana शेतकरी राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) पोर्टलवरील सर्व ई-नाम बाजारपेठांमध्ये ऑनलाइन विक्रीसाठी आपले उत्पादन अपलोड करू शकतात आणि व्यापारी या पोर्टलद्वारे कोणत्याही ठिकाणाहून खरेदीसाठी बोली लावू शकतात.

E-nam yojana योजनेबद्दल अधिक माहितीसाठी आणि तुमचे उत्पादन ऑनलाइन विकण्यासाठी ई-नाम पोर्टलला भेट द्या किंवा 18002700224 वर कॉल करा. तुम्ही तुमच्या प्रादेशिक कृषी उत्पन्न समिती बाजारपेठेच्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकता.

E-nam yojana link

Leave a Comment

error: कॉपी नको रे करू मित्रा शेअर कर !!!!!