काही गोष्टी या कायमस्वरूपी नसतात. म्हणूनच त्या आठवणीत जमा होतात. पाऊस आल्यानंतर मन हवेत तरंगल्या जाते. तरंगत तरंगत ढगात मिसळल्या जाते आणि मनातील प्रतिमा आकाशात दिसते. पावसाच्या पाणासोबत मातीही वाहून जाते तेव्हा मन मातीत दडून इवलंसं रोप होऊन बाहेर येत. माणसाचं जगणं फार विचित्र. आवडते ते करायचं पण फार उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावं. बाकी लोकांचे प्रबोधन हे तर लहानपणापासूनच भेट समजा.
माणसाला जिवंत माणसाचीच भीती जास्त असते. बाकी मृत शरीर आपल काय बिगडू शकेल. माणूस दिवसेन दिवस कठोर होत जात आहे. किंबहुना तो वृक्ष प्रेम विपरीत अहंकारी होत चालला आहे.
एखाद्यावर जीवापाड प्रेम केल की त्याला आपल्या हुकुमा प्रमाणे वागवायचं. कदाचित त्याला नजरकैदेत ठेवण्यात आनंद मानायच. एखाद वहीत ठेवलेले मोरपीस कित्तेक दिवस पानात गुरफटलेल असतं. जेव्हा पान पलटत जातो आपण तस तस मोरपीस आपल्या जवळ येत. मोरपिसाच कित्तेक दिवस वहीत राहणं यावरून वहिने त्यावर आपला हक्क दाखवायचा का ? प्रेमाचं ही तसच असतं. प्रेम केलं म्हणजे आपण कैद होऊन जातो का ह्यात शंकाच मुळात नाही. पण वाटत प्रेम आहे तर ह्या अश्या वागण्याला काळजी च नाव दिलं जात. हे पण तितकच खर की प्रेम सोबत ठेवणं.